HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|भा. रा. तांबे|संग्रह २|
सामाजिक पाश शांतिनिवास
कोठे शांति, तुझा निवास ?


भा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात



27GOOG
कोठे शांति, तुझा निवास ?

कोठे शांति, तुझा निवास ? वसशी तूं प्रीति, कोठे ? सुखा,

कोठे मंगल धाम रे तव ? धरा कीं स्वर्ग पाताळ कीं ?

लोकीं अन्य निवास का ? पडतसे छायाच येथे निकी,

तार्‍यांचा पडतो प्रकाश धरणीभागीं तसें हेहि का ?

विद्युद्दीप, हिरे, विमान, अथवा तारा, सिनेमांतरीं

किंवा कांचन-कामिनींत वसतां ? तारुण्य-बाल्यांत कीं ?

देव्हार्‍यांत मनाचिया पहुडतां गंभीर निद्रासुखीं ?

धुंडूं मी कवणे स्थळीं ? कुणि सखा दावील का हो तरी ?

किंवा केवळ अर्थशून्य असती हे शब्दची पोकळ

जैसें सुंदर नील हें नभ दिसे, अस्तित्व नाहीं परी ?

शोधूं जा तरि दूर दूर पळती हीं चक्रवालापरी

किंवा ही मृगतृष्णिका फसविते भोळ्या जनां केवळ ?

चाले नित्य अकांडतांडव इथें शोधार्थ यांच्या फुका,

देवा, तूं निजलास का ? तुज दयामाया मुळीं नाहिं का ?

Translation - भाषांतर

N/A
27GOOG

कवी - भा. रा. तांबे

काव्य प्रकार - सुनीत

वृत्त - शार्दूलविक्रीडित

ठिकाण - प्रतापगड

दिनांक - ४ मार्च १९२०



Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-09-13T07:19:40.2472896Z

Comments | अभिप्राय