HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|भा. रा. तांबे|संग्रह २|
सोन्याची घेउनि करिं झारी मंदिरीं मना तव गान भरे
आह्रानशृंग


भा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात



1GOOG
आह्रानशृंग

आह्वानशृंग तव तीव्र कसें !

रे मरण, सुटे पळ, भरे पिसें. ध्रु०

विसरे जन कीं हवी शिदोरी,

विसरे तांब्या, विसरे दोरी,

विसरे वस्त्रें जुनिं कीं कोरीं,

मग तुमान-धोतर कोण पुसे ? १

विसरे कीं मज मार्ग न ठावा,

उजेड कीं अंधार मिळावा,

स्नेह मिळे कीं मिळेल दावा,

मग धीर नसे वा भीति नसे. २

ह्या जगतांतिल सार्‍या गीती

जरि काकुळती धावत येती,

स्वर-जालीं चरणां आवाळिती,

मग कुठलें रडणें, काय हसें ? ३

आशेनें कीं नैराश्यानें,

माधुर्यानें कीं लवणानें,

भरे कुंभ जो क्षणाक्षणानें

निमिषांत तुझ्या पदिं वाहतसे. ४

Translation - भाषांतर

N/A
1GOOG

कवी - भा. रा. तांबे

जाति - नववधू

राग - जोगी

ठिकाण - इंदूर

दिनांक - ४ नोव्हेंबर १९२०


Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-09-13T08:01:34.2021792Z

Comments | अभिप्राय