HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|भा. रा. तांबे|संग्रह २|
पक्षि पिंजर्‍यांतुनी उडाला विरहांतील चित्तरंजन
दृष्ट हिला लागली !


भा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात



6GOOG
दृष्ट हिला लागली !

दृष्ट हिला लागली पडे कुणा पाप्याची साउली ! ध्रु०

लिंबलोण ग कोणी उतरा,

जगदंबेचा ग अंगारा

लावा, बांधा गंडादोरा.

काळजि घ्या चांगली ! १

चाफ्यापरि गोरेपण पिवळं,

काकडीपरी अंग कोवळं,

मैद्यापरि लुसलुशीत सगळं,

दृष्ट पडुनि करपली ! २

ज्यांच्या पोटीं उदंड माया

लेकुरवाळ्या आयाबाया,

पोक्त शहाण्या आणा दाया,

दावा चाफेकळी. ३

चिमणिसारखं तोंड जाहलं,

डोळ्यावरचं तेज चाललं,

नाक उंच वर येउं लागलं,

गत कशि ग जाहली ! ४

विशाळ डोळे लावुनि वरती

चित्रें पाही जशि काकुळती,

मधेंच दचकुनि कान देइ ती,

पोर बाइ बहकली ! ५

करकरीत तीनी सांजा ही

देवदर्शना एकलि जाई,

वार्‍यापरि ही अचपळ बाई

द्रुष्टें कुणि पाहिली ! ६

गरिब भोळसर आयाबाया,

खर्‍या दृष्टिची वार्ताहि न यां !

अनुभव घेउनि सारें वाया !

माया खरि अंधळी ! ७

 

Translation - भाषांतर

N/A
6GOOG

कवी - भा. रा. तांबे

जाति - सृष्टिलता

राग - यमनकल्याण

ठिकाण - अजमेर

दिनांक - ३ फेब्रुवारी १९२२



Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-09-13T10:16:06.8200336Z

Comments | अभिप्राय