HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|भा. रा. तांबे|संग्रह ३|
समग्र कविता संग्रह ३ हिंदु विधवेचें मन
रतलें परपुरुषाशीं


भा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात



0GOOG
रतलें परपुरुषाशीं

रतलें परपुरुषाशीं रे, मी रतलें परपुरुषाशीं. ध्रु०

मधुर मुरलिसुर हलवुनि थरथर ओढिति या चरणांशी. १

पैलतिरावर कुंज मनोहर, माझी तेथ मिराशी. २

भिकार सागर गर्जो भेसुर, पुसतें कोण तयाशी ? ३

प्रबल कुसुमशर उचलि परांवर, नेइल पैल तिराशी. ४

तरंग मनि किति ! झुळुका ढकलिति, उत्कंठा-शीडाशी. ५

चंचल उर जरि चळलें सावरि रति आवळुनि तयाशीं ६

परचुंबनमधु पिउनि पुसति वधु का शिळपट नवर्‍याशी ? ७

लज्जाभीती घोळुनि पीती रमती ज्या पर-पाशीं. ८

जडलें मन जर परपुरुषावर, भान न मग शरिराशी. ९

Translation - भाषांतर

N/A
0GOOG

कवी - भा. रा. तांबे

जाति - लवंगलता

राग - ललत

ठिकाण - अजमेर

दिनांक - २४ फेब्रुवारी १९२२



Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-09-13T10:30:42.1887520Z

Comments | अभिप्राय