HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|भा. रा. तांबे|संग्रह ३|
जेव्हां लोचन हे रुणुझुणु ये
तूं कवण जगांतिल ललना ?


भा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात



17GOOG
तूं कवण जगांतिल ललना ?

तूं कवण जगांतिल ललना ? ध्रु०

बाण-कल्पनासृष्टींतुनि का अवतरलिस या भुवना ? १

गंधर्वांच्या सुरसृष्टीमधिं पावलीस का जनना ? २

का नंदनवनकुसुम पातलिस रिझवाया मम नयनां ३

सुर-जान्हविंतिल कमलगंध का मूर्त येशि मम सदना ? ४

आनंदच का शरीर धरुनी आलिस विहसितवदना ? ५

येइं, करीं पावन या सदना लावुनि कोमल चरणा. ६

स्थिरावले हे लोचन, पडली भुरळ बघुनि तव नयनां ७

स्रवुनी सुहसित चंद्रकिरणमय उजळी या मम भुवना. ८

बहु रत्‍नांची जननि जागवी ह्रदयगुहागत कवना. ९

Translation - भाषांतर

N/A
17GOOG

कवी - भा. रा. तांबे

जाति - लवंगलता

राग - परज

ठिकाण - अजमेर

दिनांक - २२ जानेवारी १९२३



Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-09-14T06:21:21.7556736Z

Comments | अभिप्राय