HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|भा. रा. तांबे|संग्रह ३|
वाटलें नाथ हो केवळ सुखराशी
सहज तुझी हालचाल


भा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात



46GOOG
सहज तुझी हालचाल

सहज तुझी हालचाल मंत्रें जणुं मोहिते ध्रु०

सहज चालणेंहि तुझें,

सहज बोलणेंहि तुझें,

सहज पाहणेंहि तुझे

मोहनि मज घालितें. १

संसृतिचा घोर भार

बघतां तूं एकवार

विलया सखि, जाय पार,

देहभान लोपतें. २

देवी, वनदेवि म्हणूं,

स्वप्न, भास काय म्हणूं ?

प्रतिभा कीं भैरवि म्हणूं

मति माझी कुंठते. ३

एकवार बघ हासुन

डळमळेल सिंहासन !

तळमळतिल मनिं सुरगण !

हास्यास्तव खास ते ४

ही अपूर्व शक्ति सगुण

झाडितसे मम अंगण,

हें माझें भाग्य बघुन

जळफळतिल देव ते.

Translation - भाषांतर

N/A
46GOOG

कवी - भा. रा. तांबे

जाति - अरुण

राग - भैरवी

ठिकाण - लष्कर-ग्वाल्हेर

दिनांक - ३ एप्रिल १९२७


Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-09-14T06:48:30.6979776Z

Comments | अभिप्राय