HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|भा. रा. तांबे|संग्रह ३|
चरण कधीं का पाहिन आई हरि अर्पावें काय तुला मीं
वंदन व्हावें हरि, मम जीवित


भा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात



17GOOG
वंदन व्हावें हरि, मम जीवित

वंदन व्हावें हरि, मम जीवित. ध्रु०

शरीर हें अभिषेकपात्र, तें निमळ शुद्ध असावें. १

अभिषेकास्तव जीवन माझें पावन विमल असावें २

कर्मे सारीं फुलें पुजेचीं समजुनि कर्म करावें. ३

श्वासोच्छ्‌वासहि धूप पुजेचा, हें न कधीं विसरावें. ४

ज्योति जिवाची दीप पुजेचा, भावें ओवाळावें. ५

आरति व्हावी वाणी माझी, वचनीं स्तोत्र झरावें. ६

नैवेद्यास्तव नवरसभोजन, तुला ग्रास अर्पावे. ७

संपत्, संतति, मुक्ती इतरां, हरि, मज इतुकें द्यावें. ८

Translation - भाषांतर

N/A
17GOOG

कवी - भा. रा. तांबे

जाति - लवंगलता

राग - भैरवी

ठिकाण - लष्कर-ग्वाल्हेर

दिनांक - १२ जानेवारी १९२८


Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-09-14T08:35:53.5823904Z

Comments | अभिप्राय