भा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात
अर्जी ऐका हो सरकार,
अंदाधुंद कसा दरबार ?
फुंकुनि ठेविति पाय तयांवर कां दुःखाचा हो भडिमार ? १
चोर मिरविती गजगंडस्थलिं हा न्यायाचा का व्यवहर ? २
तुमचा कानू अढळ जागरुक; कां पापांची मग ललकार ? ३
तुमच्या वाटा तुम्हांस ठाऊक, इतरां लागे अंत न पार ! ४
कवी - भा. रा. तांबे
जाति - हरिभगिनी
राग - बिहाग
ठिकाण - लष्कर-ग्वाल्हेर
दिनांक - सप्टेंबर १९२९