HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|भा. रा. तांबे|संग्रह ३|
भोग कुणा सुटले झांशीवाली
सखि आली !


भा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात



3GOOG
सखि आली !

अरुणनयन

अरुणचरण

अरुणवसन

सखि आली,

ही अरुणोदयकालीं !

कांति फांकली सखिच्या तनुवर

उजळे मम घर

अनुपम सुंदर,

हास्य विकसलें गालीं.

सखि आली. १

डोह विमल,

पुण्य सलिल

स्फटिकोज्जवल

द्युतिशाली

प्रसन्न मोहनि घाली.

प्रसन्न सखिचे प्रस्फुट अवयव,

यौवनवैभव

फुललें अभिनव,

अरुणकिरणिं सखि न्हाली,

सखि आली ! २

Translation - भाषांतर

N/A
3GOOG

कवी - भा. रा. तांबे

राग - मारवा एकताल

ठिकाण - लष्कर-ग्वाल्हेर

साल - १९२९



Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-09-14T08:57:42.7048160Z

Comments | अभिप्राय