HOME|
मराठी मुख्य सूची|
मराठी साहित्य|
गाणी व कविता|
भा. रा. तांबे|
संग्रह ३|
वधूवरयोः शुभं भवतु !
भा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात
वधूवरयोः शुभं भवतु !
योग हा वधुवरां
हो सुमंगल खरा !
हो सुमंगल खरा !
हो सुमंगल खरा !
हो सुमंगल खरा ! ध्रु०
आज ह्रदयांतुनी
सकल पट भेदुनी
आन्तरिक ये ध्वनी
"हो सुमंगल खरा !" १
जीव ही मम सुता
रूपगुणसंयुता
तुल्यवरसंगता
श्री नवी ये घरा. २
याच घटिपासुनी
पुण्य परिवर्तनीं
रम्य नवजीवनीं
प्रीति येवो भरा. ३
नवनव्या कामना,
नवनव्या कल्पना,
नवनव्या भावना
वेढितिल अंतरा. ४
जीवनक्रांतिचा
दिवस नव कांतिचा,
विभव-सुख-शांतिचा
होउ हा आसरा. ५
रम्य संसारतरु
शीत छाया धरू,
मधु फुलांहीं भरू
ओटी मंगलकरा. ६
आयुरारोग्य तें,
सत्कुला योग्य तें,
पुण्य चिरभोग्य तें
सकल येवो करा. ७
झडति किति चौघडे,
घुमुनि नौबत झडे,
दुमदुमुनि चहुकडे
हर्ष आला पुरा. ८
Translation - भाषांतर
N/A
कवी - भा. रा. तांबे
जाति - सुरमंदिर
भैरवी झपताल
ठिकाण - लष्कर - ग्वाल्हेर
दिनांक - फेब्रुवारी १९३४
Created by
TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on
2007-09-15T05:47:34.9045552Z
Comments | अभिप्राय