भा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात
माझे बांधुनि हातपाय कुजक्या एका फळीला बळें
दर्यामाजि अफाट दुस्तर मला हे नाथ, कां सोडिलें ?
'शिंतोडा पदरावरी जरि उडे जाई तळाला फळी'
ऐशी ही धमकी वरी, गति कशी व्हावी तुफानीं जळीं ?
कवी - भा. रा. तांबे
वृत्त - शार्दूलविक्रीडित
ठिकाण - लष्कर-ग्वाल्हेर
दिनांक - २८ जानेवारी १९३५