HOME|
मराठी मुख्य सूची|
मराठी साहित्य|
गाणी व कविता|
भा. रा. तांबे|
संग्रह ३|
माझ्या अंगणांत
भा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात
माझ्या अंगणांत
माझ्या अंगणांत
चिमण्यांची किलबिल;
हळू पाय टाका,
भुर्र उडूनी जातील. १
बहिणीशीं नको
वांकडा लावूं बोल;
आतां कीं भाऊराया,
सांभाळी तुझा तोल. २
वांकडा बोल तुझा
तुझें काळीज कापील;
सासरीं गेल्यावरी
तुझ्या दारीं न येतील. ३
भ्रताराच्या राज्यीं
उणें ठेवीना रे देव;
बहिणीच्या मनीं
चोळीची आशा ठेव! ४
Translation - भाषांतर
N/A
कवी - भा. रा. तांबे
ओवी
ठिकाण - लष्कर-ग्वाल्हेर
दिनांक - २५ फेब्रुवारी १९३५
Created by
TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on
2007-09-15T16:02:31.1787920Z
Comments | अभिप्राय