HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|भा. रा. तांबे|संग्रह ३|
ये पहाटचा तारा गगनीं कुणि असेल ग
प्रिया हेंच सर्वस्व !


भा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात



33GOOG
प्रिया हेंच सर्वस्व !

दुनियेच्या भरल्या बाजारीं तुम्हिच करा जा सौदा;

मला फकीरा पुरे प्रिया ही, नको गजाचा हौदा.

वेळ न खणण्या भूतकाळ, जा उकरा दौलत पुरली;

मला आळशा पुरे प्रिया अणि ओठावरली मुरली.

वाट भविष्यीं पुसत जा ग्रहां चाचपडत अंधारीं;

मूर्त सुखचि ही प्रिया सोडुनी अमूर्त कोण निहारी ?

तुम्हीच मिळवा स्वर्गिं अमरपद हवि अर्पुनिया देवा;

स्पर्शें सखिच्या अमर जाहलों, मला न तुमचा हेवा.

भरा भरार्‍या कल्पनेचिया अजब अशा मुलखांत,

मूर्त कला लाभतां कशाला वार्‍यावरिल वरात ?

जा कुठेहि जगिं या कांह न् कांहीं उणें,

तिळ एक न जागा कोठें न्यूनाविणें,

मग केविलवाणें काय वृथा हिंडणें ?

एक सखीच्या ह्रदयिं पूर्णता मज लाभे संसारीं -

कशास वणवण करूं वृथा मी हिंडुनि दारोदारीं ?

Translation - भाषांतर

N/A
33GOOG

कवी - भा. रा. तांबे

जाति - लवंगलता

ठिकाण - लष्कर-ग्वाल्हेर

दिनांक - ७ मार्च १९३५



Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-09-15T16:10:59.7200384Z

Comments | अभिप्राय