HOME|mr|sahitya|gaani|tambe|04|
चुकला बाण घर राहिलें दूर
मावळत्या सूर्याप्रत


भा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात.



30GOOG
मावळत्या सूर्याप्रत

मावळत्या दिनकरा, अर्घ्य तुज जोडुनि दोन्हीं करां ध्रु०

जो तो वंदन करी उगवत्या,

जो तो पाठ फिरवि मावळत्या,

रीत जगाची ही रे सवित्या !

स्वार्थपरायणपरा. १

उपकाराची कुणा आठवण ?

'शितें तोंवरी भुतें' अशी म्हण;

जगांत भरलें तोंडपुजेपण,

धरी पाठिवर शरा ! २

असक्त परि तूं केलिस वणवण,

दिलेंस जीवन, हे नारायण,

मनीं न धरिलें सानथोरपण.

समदर्शी तूं खरा ! ३

प्रभु-सचिवा विरहीं मुखधूसर

होति दयामृदु नयनिष्ठुर कर

टाकुनि कारभार चंद्रावर

चाललास तूं घरा ! ४

Translation - भाषांतर

N/A
30GOOG

कवी - भा. रा. तांबे

जाति -सृष्टिलता

राग - यमन

ठिकाण - लष्कर ग्वाल्हेर

दिनांक - ३ ऑक्टोबर १९३५


Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-09-15T16:36:32.5936256Z

Comments | अभिप्राय