HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|भा. रा. तांबे|संग्रह ४|
तें कोण या ठायिं संगीत कलेप्रत
वायो, खुणव तीस


भा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात



45GOOG
वायो, खुणव तीस

येतां तुझ्या दारिं मी वाट चालोनि

चालें पुढे, येथ थांबोनि थांबोनि. ध्रु०

असशील तूं आंत घरकामधंद्यांत,

रेंगाळी कुणि दारिं, तुज भान कोठोनि ! १

छुमछुम तुझे पाय स्रवतात नव राग,

कुणि भाग्यवंतास सुख आंत ऐकोनि ! २

डोळे तुझे जेथ पडति घरामाजि

सौभाग्य अरुणास त्या ठायिं नाचोनि ! ३

मी मात्र या दारिं घोटाळिं आशाळ,

कीं ढुंकशिल काय येथोनि तेथोनि ! ४

चाले असें येथ हें रोजच्या रोज,

सांगेल तुज कोण दारीं उभे कोणि ? ५

मी टाकितों येथ काळीज हें फूल;

वायो ! खुणव तीस, ने वास वाहोनि ! ६

Translation - भाषांतर

N/A
45GOOG

कवी - भा. रा. तांबे

जाति - किंकिणी

राग - बागेसरी कानडा

ठिकाण - लष्कर ग्वाल्हेर

दिनांक - ८ जानेवारी १९३६


Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-09-16T04:29:00.4005456Z

Comments | अभिप्राय