HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी कथा|तात्पर्य कथा|इसापनीती|कथा १ ते ५०|
देव आणि प्रवासी दोन कोंबडे
धनगर व्यापारी झाला होता


इसापने रचलेल्या गोष्टी केवळ उपदेशपर नसून अत्यंत रंजक आहेत.

Many stories included in Aesop's Fables, are distinguished by its own special characteristics and moral.



45GOOG
धनगर व्यापारी झाला होता

एक धनगर समुद्राकाठी बसून मेंढ्या चारीत असता समुद्र पाहून फार मोहीत झाला. तेव्हा समुद्र अगदी शांत होता व त्यावर गलबते फिरत होती. ते पाहून आपणही समुद्रात व्यापार करावा असे त्यास वाटले व त्याने मेंढ्या विकून एक गलबत विकत घेतले व तो माल भरून व्यापारास निघाला. परंतु वाटेत मोठे वादळ झाले व त्यामुळे गलबत बुडू नये म्हणून सगळा माल त्याला समुद्रात फेकून द्यावा लागला. शेवटी त्याचे जहाज एक खडकावर आपटून फुटले व तो कसाबसा वाचला.

यानंतर त्याने ज्या माणसाला आपल्या मेंढ्या विकल्या होत्या, त्याच्याकडे तो मेंढ्या राखण्यासाठी चाकरी करू लागला. असाच एकदा पुन्हा तो समुद्रकाठी आला असता समुद्राकडे बघून म्हणाला.

'आता काही मी तुला भुलणार नाही. तुझं स्वरूप मला चांगलं समजलं आहे.'

तात्पर्य - ज्याने आपल्याला एकदा फसविले त्याचा पुन्हा विश्वास धरणे धोक्याचे आहे.

Translation - भाषांतर

N/A
45GOOG
References : N/A

Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-07-18T16:25:55.0000000Z

Comments | अभिप्राय