HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी कथा|तात्पर्य कथा|इसापनीती|02|
दोन कोंबडे गप्पीदास
गाढव आणि लांडगा


इसापने रचलेल्या गोष्टी केवळ उपदेशपर नसून अत्यंत रंजक आहेत.

Many stories included in Aesop's Fables, are distinguished by its own special characteristics and moral.



57
गाढव आणि लांडगा

एकदा एक गाढव रानात भटकत होते. फिरता फिरता त्याच्या पायाला एक काटा बोचला. तो काटा काही त्याला काढता येईना. तेवढ्यात तिकडून एक लांडगा येताना त्याला दिसला. गाढव नम्रपणे त्याला म्हणाले, 'वैद्यबुवा ! कृपा करून माझ्या पायातला हा काटा आपण काढून द्या.' लांडग्याने ते ऐकले आणि त्याच्या पायातला काटा काढून दिला. परंतु, त्या दुष्ट गाढवाने लगेच एक लाथ लांडग्याच्या तोंडावर मारली आणि कोलमडून पडलेल्या लांडग्याकडे बघत ते मजेने निघून गेले.

तात्पर्य - काही माणसे इतकी कृतघ्न असतत, की ज्याने आपल्याला संकटातून वाचविले त्याच्याशीसुद्धा ते शिष्टपणे वागतात.

Translation - भाषांतर

N/A
57
References : N/A

Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-07-18T16:27:56.0000000Z

Comments | अभिप्राय

Please join {Khapre.org} Group on facebook and to write on to our wall, participate in group discussions..

Connect to us