HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पाळणे|
रामाचा पाळणा बाळा जो जो रे कुळभूषणा । लवकुशाचा पाळणा
रामाचा पाळणा - जो जो जो जो रे रघुराया । ...


रामाचा पाळणा



45GOOG
रामाचा पाळणा

जो जो जो जो रे रघुराया । निद्रा करि बा सखया ।

जोगी आलासे भेटाया । शशिसम देखुनि काया ॥धृ॥

जोगी दिसतो सुंदर । मस्तकी जटाभार ।

गळा रुंडमाळांचे हार । शोभे व्याघ्रांबर ॥१॥

भस्म चर्चूनी सर्वांगी । वेष्टिला भुजंगी ।

भूतें घेऊनी स्व‍अंगी । आला प्रेमरंगी ॥२॥

जटेमधूनिया तो जळ वाहे । मुद्रा लावुनि पाहे ।

मान धरुनिया तो राहे । न कळे कोण आहे ॥३॥

इतुके ऎकुनिया वचन । हासले रघुनंदन ।

भावे पदकमळी तल्लीन । गोसावीनंदन ॥४॥

Translation - भाषांतर

N/A
45GOOG
N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-05-20T19:56:23.0000000Z

Comments | अभिप्राय