HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पाळणे|
रामाचा पाळणा जो जो जो जो रे रघुराया । कृष्णाचा पाळणा बाळा जो जो रे कुळभूषणा ।
लवकुशाचा पाळणा


लवकुशाचा पाळणा lav-kush Palana

30GOOG
लवकुशाचा पाळणा

मी हिंडविते गाउनिया लडिवाळा । पाळणा लवकुश बाळा ।

मी वासंती आळविते अंगाई । छकुल्यांनो तुमची आई ।

लुकलुकती चिमणॆ डोळॆ । जिभली ही चुट चुट बोले ।

वर उचलाया बाळ भुवयांची जोडी । लवितसे लाडीगोडी ॥१॥

किती दिवस अशी चाटणार ही बोटे । व्हा गडे लवकर मोठे

मग जाऊ या आपण सारी मिळुनी । बघण्यास अयोध्या भुवनी ।

अळी मळी गुपचिळी बरं का । सांगाल कुणाल जर का ।

कुस्करीन गाल हे बरं का । अन् इवलाले ओठ असे झाकुनी ।

ठेवीन मुके घेऊनी ॥२॥

Translation - भाषांतर

N/A
30GOOG
References : N/A

Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-09-03T20:36:10.1982080Z

Comments | अभिप्राय