HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पाळणे|
पाळणे गणपतीचा पाळणा जो जो जो जो रे गजवदना । प
गणपतीचा पाळणा - जो जो जो जो रे गजवदना । म...


गणपतीचा पाळणा - Ganapati Palana

45GOOG
गणपतीचा पाळणा

जो जो जो जो रे गजवदना । मयुरेश्‍वर सुखवदना ।

निद्रा करि बाळा एकरदना । सकळादी गुणसगुणा ॥धृ॥

गंडस्थळ शुन्डा ते सरळी । सिदुंर चर्चुनि भाळी ।

कानी कुंडले ध्वजजाळी । कौस्तुभ तेज झळाळी ॥१॥

पालख लावियला कैलासी । दाक्षयणिचे कुशी ।

पुत्र जन्मला हॄषकेशी । गौरिहाराचे वंशी ॥२॥

चौदा विद्यांचा सागर । वरदाता सुखसागर ।

दुरिते निरसिली अपार । विष्णूचा अवतार ॥३॥

लंबोदर म्हणता दे स्फुर्ति । अद्‍भुत ज्याची किर्ती ।

जीवनसुत अर्ची गुणमुर्ती । सकळिक वांछा पुरती ॥४॥

Translation - भाषांतर

N/A
45GOOG
References : N/A

Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-09-02T07:40:47.0000000Z

Comments | अभिप्राय