HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पुराणे|नागनाथ माहात्म्य|
नागनाथ माहात्म्य नागोजीबुवा नागनाथ माहात्म्य उद्धवाचिद्धनकृत नागनाथ चरित्र
नागनाथ माहात्म्य - श्री चवंडा


नागनाथ हे नवनाथापैकी असून ते साक्षात शंकराचाच अवतार होय.



45GOOG
श्री चवंडा

पहिला अभंग

त्रिभुवनाचा स्वामी आला चंद्रमौळीसी ।

तारक विश्वाचा प्रसन्न झाला भक्तासी ।

भक्तमृत्युलोकी हेगरस परियेसी ।

आण वद्य चवतीसी आला चैत्रमासासी ।

आण चंद्राविण चांदण कृपा केली भक्तासी ।

रिद्धिसिद्धीचा दातार आला चंद्रमौळीसी ।

दाविले निजरुप सिद्धि विंधली तयासी ।

मग जिकडे तिकडे अवघा नागेश प्रकाशु ।

अवघा भुजंगु प्रकाशु ।

मग हेगरस पुत्र गेला पाचारु तयासी ।

मग नागेश बोलिले तै पुत्रासी ।

प्रकृतीचे अंगी कार्य संपादणे बैसी ।

मग उठा उठा हो स्वामी तुम्ही पितृकार्यास ।

मग आम्हासि कैचा पित्रु तूच आमुचा जगदीश ।

मग उठला नागेश मग उठला भुजंग भडंग घेतला भेस । चर्माची वस्त्रे शोभती तयास ।

स्वर्गाहून विमान आले चंद्रमौळीसी ।

नागोबा दयाळ भुजंग दयाळ आला चंद्रमौळीसी ।

मग सकळ संताचा दास विनवी चवंडालिंग चिद्धनासी ।

- चवंडा

दुसरा अभंग -

धन्य धन्य ते मोहोळ ।

हेचि मोक्षाचिये स्थळ ॥१॥

वेद वाखाणिता शिनला ।

साही शास्त्र भांबावला ॥२॥

नागेश त्रैलोकीचा राजा ।

आलासे भक्ताचिया काजा ॥३॥

तेथे हेगरस उपकार ।

तया नसेचि पारावार ॥४॥

वसतसे सोळा सिद्धथोर ।

तेथे चैतन्याचे माहेर ॥५॥

दैवे लाधली संपत्ती ।

अपार सुखाची प्राप्ती ॥६॥

बाबा सिद्धलिंग सद्‌गुरु ।

तोचि तारक भवसागरु ॥७॥

तेथे नसेचि जन्म मरण ।

चवंडा धरी गुरु चरण ॥८॥

Translation - भाषांतर

N/A
45GOOG
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2008-09-27T13:50:04.7650092-04:00

Comments | अभिप्राय