HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पुराणे|नागनाथ माहात्म्य|
नागनाथ माहात्म्य नमस्कार
नागनाथ माहात्म्य - करुणाष्टक


नागनाथ हे नवनाथापैकी असून ते साक्षात शंकराचाच अवतार होय.



45GOOG
करुणाष्टक

श्रीनागनाथा कर ठेवि माथा ।

संसार व्याधी निरसी समर्था ।

तू थोर दाता या मृत्युलोकी ।

कृपाकटाक्षे मज आवलोकी ॥१॥

मी मागतो तुज एक दान ।

त्वरे निवारी भवदुष्टस्वप्न ।

उदार राजा शिव सिद्धनाथा ।

कृपानिधी तारक तारि आता ॥२॥

नको विचारु गुणदोष माझे ।

शरणागताचे तू घेशि ओझे ।

सांभाळ बापा आपुल्या ब्रिदासी ।

चिंतीतसे मी तुझिया पदासी ॥३॥

मी थोर कृतघ्न मोठा ।

पादारविन्दी न घडेचि निष्ठा ।

हे एक ठायी मन ठेवि देवा ।

ऐक्य करी सत्वर जीवशीवा ॥४॥

तपतीर्थ नेम ।

त्रिसंध्या विधियुक्त कर्म ।

वैराग्य देही अणुमात्र नाही ।

भावार्थ भक्ती न घडेचि काही ॥५॥

अपराधी अपराधराशी ।

समासमुद्रा मज मोक्ष देशी ।

बद्धत्वतेचा भ्रम हारवीसी ।

विकर्म इंधन ज्ञाननळेचि नाशी ॥६॥

तापवीरा गुरु आवतारा ।

जडजीव नामस्मरचेचि तारा ।

अज्ञान ज्ञान निरसूनि दोनी ।

विज्ञानबोध परवस्तुदानी

गुरु सिद्ध तू फणीन्द्रा

तू दाविसी खेचरी सिद्ध मुद्रा ।

शीघ्रासन घालुनी बैसवीला ।

म्हणे सिद्धलिंग हे दाखविले मजला ॥७॥

Translation - भाषांतर

N/A
45GOOG
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2008-09-27T14:09:57.7058492-04:00

Comments | अभिप्राय